हे सांज फुललिया, वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया वात पेटलिया
सांज फुललिया, वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया वात पेटलिया
अरे रंग दे तुझ्या पिरमाचा
तुझ्या केसातला मी गजरा झालो
तुझ्या पिरमाच्या लाटामंधी
वाहत मी गेलोया ग वाहत मी गेलोया
हे ध्यास हयो मनात माझ्या भास हयो उरात माझ्या
आवाज तुझा हयो गोड कानात साठला माझ्या
हे ध्यास हयो मनात माझ्या भास हयो उरात माझ्या
आवाज तुझा हयो गोड कानात साठला माझ्या
वारा फुल विसरून मीच मला गेलोया गं मी च मला गेलोया
सांज फुललिया, वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया, वात पेटलिया
हे बघताच डोळ तुला स्थिरावून जात्याती
माग तुझ्या आठवणी सपनात येत्याती
हे बघताच डोळ तुला स्थिरावून जात्याती
माग तुझ्या आठवणी सपनात येत्याती
लाजून मलाच म्या गालामंदी
एकलाच हसतोया
एकलाच हसतोया
सांज फुललिया, वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया वात पेटलिया
अरे रंग दे तुझ्या पिरमाचा
तुझ्या केसातला मी गजरा झालोय
तुझ्या पिरमाच्या लाटामंधी (आ)
वाहत मी गेलोया ग वाहत मी गेलोया